आचार्य गुरुकुलम् फ्रँचायझी – संस्कार व संस्कृतीसह बालविकासाचा आदर्श मार्ग
...
शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व आणि सर्वांगीण विकासासाठी आधारस्तंभ असते. आचार्य गुरुकुलाम ही अशीच एक संस्था आहे जिथे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार, शिस्त आणि आत्मविश्वास यांचा समतोल अनुभव मिळतो.

आचार्य गुरुकुलम् आता आपल्या फ्रँचायझी प्रकल्पासह प्रत्येक घराघरात पोहोचत आहे. या प्रकल्पाचा उद्देश प्रत्येक बालकात भारतीय संस्कृती, संस्कार आणि मूल्यांची रूजवात करणे आहे. फ्रँचायझी मॉडेलमध्ये दोन प्रकार आहेत: आचार्य गुरुकुलम् संस्कार मंदिर (Nursery, LKG, UKG, Std. 1–2) जे मुलांना सुसंस्कृत शिक्षण आणि भारतीय परंपरेशी जोडणारे कार्यक्रम देईल, आणि बाल संस्कार मंदिर (Nursery, LKG, UKG) जे लहान मुलांसाठी संस्कारप्रधान वातावरण निर्माण करेल. हा प्रकल्प मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि नैतिक विकासावर लक्ष केंद्रित करतो आणि प्रत्येक शाळा फक्त शिक्षण देण्यापुरती मर्यादित न राहता संस्कार, संस्कृती आणि नैतिक मूल्ये पिढ्यानपिढ्या पुढे पोहचवण्याचे काम करेल. जर तुम्ही देखील भारतीय संस्कृतीला प्रोत्साहन देणारी शाळा सुरू करायची इच्छा बाळगत असाल, तर आचार्य गुरुकुलम् फ्रँचायझी तुमच्यासाठी आदर्श संधी आहे.

 

whatsapp--v1