अनुभवी आणि समर्पित शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक मार्गदर्शन व गुणवत्तापूर्ण शिक्षण देतात.
शिक्षक पहाशैक्षणिक प्रगतीसोबतच विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार, शिस्त, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी विकसित केली जाते.
अधिक वाचाविद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळेकडून नियोजित व विश्वासार्ह वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
वाहतूक माहितीआचार्य गुरुकुलम् येथे विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक व आरोग्यदायी अन्न व्यवस्था आहे. दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, हाय टी तसेच ताजे व संतुलित आहार दिला जातो.
Foodआचार्य गुरुकुलम् येथे शाळा सकाळी ८ ते संध्याकाळी ८ या वेळेत चालते. या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकाग्रता आणि सर्वांगीण विकास साधला जातो.
Know Moreमुलींसाठी सुरक्षित, शिस्तबद्ध आणि संस्कारक्षम वातावरणातील निवासी सुविधा. शिक्षणासोबत स्वावलंबन, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन देणारे वसतिगृह.
अधिक वाचा
आमचे शिक्षक हे 'आचार्य गुरुकुलम्'चे खरे बलस्थान आहेत. प्रत्येक शिक्षक हा अनुभवी, उच्चशिक्षित आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्णपणे समर्पित आहे. केवळ पुस्तकी ज्ञान न देता, विद्यार्थ्यांमध्ये उत्तम संस्कार, शिस्त आणि नैतिक मूल्ये रुजवणे हेच आमचे ध्येय आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देऊन, त्यांना भविष्यातील आदर्श नागरिक आणि खंबीर नेतृत्व बनवण्यासाठी आमचे गुरुजन नेहमीच कटिबद्ध आहेत.
Teaching
Teaching
Teaching
Teaching
आचार्य गुरुकुलममधील अनुभवाबद्दल आमचे पालक आणि विद्यार्थी काय म्हणतात ते जाणून घ्या.
आजच्या धावपळीच्या जीवनात पालकांना आपल्या मुलांची घरच्यासारखी काळजी घेणारी शाळा हवी असते, आणि तीच काळजी आम्हाला आचार्य गुरुकुलममध्ये मिळाली आहे.
माझा तीन वर्षांचा मुलगा गुरुकुलमध्ये येतो. मी नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रात काम करत असल्यामुळे मला सतत कामासाठी बाहेर राहावं लागतं. पण माझा मुलगा सकाळी आठ ते संध्याकाळी साडेसात-आठपर्यंत गुरुकुलमध्ये असतानाही मला त्याची अजिबात काळजी वाटत नाही. इथे अगदी घरच्यासारखी, प्रेमाने आणि आपुलकीने लहान मुलांची काळजी घेतली जाते.
माझ्या मुलामध्येही खूप छान बदल झाले आहेत. जेवणापूर्वी तो स्वतःहून श्लोक म्हणण्याबद्दल सांगतो आणि दिवसभर गुरुकुलमध्ये केलेल्या ॲक्टिव्हिटीज घरी आल्यावर आम्हाला उत्साहाने सांगतो. हे बदल पाहून खूप आनंद होतो.
एक आई म्हणून मला एवढंच सांगावंसं वाटतं की, आचार्य गुरुकुलममध्ये मुलं केवळ शिकत नाहीत, तर प्रेम, संस्कार आणि शिस्त यांसोबत वाढतात. त्यामुळे पालक म्हणून आम्ही निश्चिंत राहू शकतो. धन्यवाद, आचार्य गुरुकुलम!
माझ्या दोन्ही मुली पहिलीपासून आचार्य गुरुकुलममध्ये शिकत आहेत. इथलं सुरक्षित वातावरण, प्रेमळ शिक्षक आणि विविध ॲक्टिव्हिटीज यामुळे आम्ही पालक म्हणून खूप समाधानी आहोत.
मुली सकाळी आनंदाने गुरुकुलमध्ये येतात आणि संध्याकाळी आठ वाजताही तितक्याच उत्साहात असतात. त्यांच्या आनंदामुळे आणि इथल्या संस्कारांमुळे आम्हाला त्यांची काळजी न करता आमच्या कामावर लक्ष केंद्रित करता येतं.
आचार्य गुरुकुलमने आमच्या मुलींना केवळ शिक्षणच नाही, तर सुरक्षितता, आनंद आणि चांगले संस्कारही दिले आहेत. आमच्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आचार्य गुरुकुलमची निवड केल्याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. संपूर्ण टीमचे खूप खूप आभार!
शाळेने व्यावहारिक कौशल्यांवर दिलेल्या लक्षामुळे मी प्रभावित झालो. माझा मुलगा केवळ सिद्धांतच शिकत नाही, तर तो सक्रियपणे समस्या सोडवण्याची आणि चिकित्सक विचार करण्याची क्षमता विकसित करत आहे. आचार्य गुरुकुलम विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने भविष्यासाठी तयार करते.
माझा मुलगा शिवांश गेल्या तीन वर्षांपासून आचार्य गुरुकुलममध्ये शिकत आहे.
गुरुकुलमध्ये शिकायला लागल्यापासून त्याच्या अभ्यासात चांगली प्रगती झाली आहे. विशेषतः मॅथ्स आणि फिजिक्समधील त्याचे स्कोअर सुधारले आहेत. आता तो प्रश्न अधिक सहजपणे आणि आत्मविश्वासाने सोडवतो. तसेच, मेडिटेशनमुळे त्याची एकाग्रता वाढली आहे आणि त्याच्यातील उत्साह व सकारात्मकताही वाढलेली जाणवते.
एक पालक म्हणून माझ्या मुलामध्ये होत असलेले हे बदल पाहून मला खूप आनंद होतो. आचार्य गुरुकुलममधील शिक्षकांचे आणि संपूर्ण टीमचे मनापासून आभार!
माझा मुलगा आदित्य गेली तीन वर्षे आचार्य गुरुकुलममध्ये शिक्षण घेत आहे. पहिली दोन वर्षे तो पुणे शाखेत होता आणि आता माळशिरस शाखेत शिकत आहे. माळशिरस शाखेतील निसर्गरम्य वातावरण आणि उत्तम सोयीसुविधा मला विशेष आवडतात.
इथल्या शिक्षणाची पद्धतही खूप चांगली आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार विशेष बॅचेस घेऊन त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते, ज्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होते. शिक्षणासोबतच शिस्त आणि इतर सोयीसुविधाही उत्तम आहेत. त्यामुळेच मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी आचार्य गुरुकुलमची निवड केली आणि आजही या निर्णयाबद्दल समाधानी आहे.
माझा मुलगा गेल्या तीन वर्षांपासून आचार्य गुरुकुलममध्ये शिकत आहे. पण गेल्या दोन वर्षांत मला ज्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या, त्या खरोखरच कौतुकास्पद आहेत.
इथे केवळ पुस्तकी शिक्षण न देता मुलांसाठी मेडिटेशन, विविध ॲक्टिव्हिटीज आणि मैदानी खेळ यांचे खूप छान नियोजन केले जाते. त्यामुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल घडताना दिसतात. शिक्षकांचे मुलांकडे लक्ष देण्याची पद्धत, त्यांना समजून घेणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतले जाणारे प्रयत्न मला खूप आवडले.
मला असं वाटतं की, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी इथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात. विशेष म्हणजे, मला इथल्या सरांकडून खूप चांगला सपोर्ट मिळाला, ज्याची मला अपेक्षा नव्हती. त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे माझा विश्वास आणखी वाढला आहे.
**एक पालक म्हणून मला समाधान आहे की माझ्या मुलाला इथे केवळ शिक्षणच नाही, तर चांगले संस्कार, शिस्त आणि जीवनात उपयोगी पडणाऱ्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. आचार्य गुरुकुलमच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार!**
माझा मोठा मुलगा गेल्या चार वर्षांपासून आचार्य गुरुकुलममध्ये शिकत आहे. या चार वर्षांच्या अनुभवातून मला जाणवलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इथे केवळ पुस्तकी शिक्षण दिलं जात नाही, तर मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो.
सामान्य शाळा आणि आचार्य गुरुकुलममध्ये मला जाणवलेला मुख्य फरक म्हणजे इथे मुलांना अभ्यासासोबत योगा, श्लोक, शारीरिक व्यायाम, दैनंदिन दिनचर्या, स्वच्छतेच्या सवयी आणि मोठ्यांशी कसं वागावं, यांसारख्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या गोष्टीही शिकवल्या जातात. या गोष्टी मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, असं मला वाटतं.
एक पालक म्हणून आम्ही दोघेही खूप समाधानी आहोत की आमच्या मुलाला अशा शाळेत शिकण्याची संधी मिळाली. इथे त्याला केवळ शिक्षणच नाही, तर चांगले संस्कार, शिस्त आणि जीवनाकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन मिळत आहे.
माझ्या मुलाच्या भविष्याचा विचार करता, आचार्य गुरुकुलमची निवड करणं हा आमच्यासाठी खूप चांगला निर्णय ठरला आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने चांगलं शिकावं, चांगला माणूस व्हावं आणि आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहावं असं वाटतं. त्या दृष्टीने आचार्य गुरुकुलम मुलांना घडवण्याचं खूप चांगलं काम करत आहे. आम्हाला अशी शाळा मिळाली, हे मी आमचं भाग्य समजतो. आचार्य गुरुकुलमच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार!
माझ्या मुलामध्ये आज जो काही सकारात्मक बदल आणि शिस्त दिसून येते, त्यामध्ये आचार्य गुरुकुलमचा खूप मोठा वाटा आहे. इथल्या शिक्षकांचे मार्गदर्शन, मुलांवर घेतले जाणारे लक्ष आणि शिस्तीला दिले जाणारे प्राधान्य यामुळे मुलांमध्ये चांगले बदल घडत आहेत.
आचार्य गुरुकुलमचे मनापासून आभार!
आम्ही विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत जे त्यांना यशस्वी भविष्यासाठी तयार करेल. आमचा दृष्टिकोन आधुनिक आणि सुरक्षित शिक्षण वातावरणासह विद्यार्थ्यांचा वैयक्तिक विकास आणि शैक्षणिक उत्कृष्टतेवर लक्ष केंद्रित करतो.
.
.
.
.
.
.