आमच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल, शैक्षणिक पद्धतीबद्दल आणि शाळेच्या नियमांबद्दल पालकांच्या मनात अनेकदा काही प्रश्न असतात. पालकांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी आम्ही खाली काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
गुरुकुलमधील विद्यार्थ्यांमध्ये नम्रता, चिकाटी, आदर, आत्मविश्वास, प्रेम, निष्ठा आणि संयम यांसारखे गुण रुजवले जातात.
गुरुकुलमधील मुलगा किंवा मुलगी स्वतःचे मत परखडपणे आणि आत्मविश्वासाने मांडू शकेल. वडीलधाऱ्यांप्रती असलेला आदर आणि प्रेम त्यांच्या वर्तनातून सहज जाणवेल.
आमच्याकडे अडीच वर्षांपासून सध्या मुले आहेत आणि ती खूप आनंदाने गुरुकुलमध्ये राहतात.
मुलांना त्यांचे बालपण गुरुकुलमध्ये मनापासून जगता यावे, याची काळजी घेतली जाते.
मुख्य म्हणजे मुलांच्या दैनंदिन शेड्यूलमध्ये तीन वेळा व्यायाम आणि Meditation असते. त्यामुळे मुलांना साधारण पंधरा मिनिटांची एकाग्र आणि जागृत विश्रांती मिळते.
मुलांना अभ्यासासोबतच मजा, मस्ती, खेळ आणि विविध उपक्रमांची संधी दिली जाते.
शनिवारी मुलांसाठी Fun Day आयोजित केला जातो. यामध्ये त्यांना प्रेरणादायी चित्रफिती आणि भाषणे दाखवली जातात. त्यानंतर त्यावर चर्चा केली जाते आणि मुलांना त्यातून काय समजले, हे जाणून घेतले जाते.
शनिवारी मुलांसाठी नवीन आणि व्यावहारिक Activity देखील घेतल्या जातात. उदाहरणार्थ, Business Introduction, Pen तयार करणे, Pencil तयार करणे अशा विविध उपक्रमांचा त्यामध्ये समावेश असतो.त्यामुळे त्यांना अजिबात कंटाळा येत नाही.
विशेष म्हणजे संध्याकाळी साडेसातनंतरसुद्धा मुलांना गुरुकुलमध्ये थांबावेसे वाटते.
मुलांना सुरुवातीपासूनच वाचन आणि लेखनाचा सराव करून घेतला जातो. वर्गातील Small Instructions हळूहळू इंग्रजीमध्येच दिल्या जातात.
जसा मुलांचा वर्ग पुढे जातो, तसतसे इंग्रजी व्याकरणही शिकवले जाते.
सहावीपासून Spoken English आणि Teaching साठी Practical Subject म्हणून इंग्रजीचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे मुलांना इंग्रजी समजण्यासोबतच ते आत्मविश्वासाने बोलण्याचा सरावही होतो.
मुलांना प्रथम एक भाषा व्यवस्थित आणि मजबूत करून घेतली जाते. त्यानंतर नवीन भाषा शिकताना मराठी आणि इंग्रजीच्या वाक्यरचनेमधील मूलभूत फरक मुलांना समजावून सांगितले जातात.
मुलांना सोपी इंग्रजी वाक्ये बोलण्याचा नियमित सराव करून घेतला जातो. त्यामुळे त्यांच्यामध्ये हळूहळू इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो.
साधारणपणे सहा ते सात महिन्यांच्या कालावधीत मुलाला इंग्रजी भाषेची चांगली ओळख आणि वापर करता येऊ लागतो.
आपल्या गुरुकुलमध्ये प्रत्येक विषय केवळ वरवर न शिकवता त्याचा सखोल अभ्यास करून घेतला जातो.
पाचवी आणि त्यापुढील वर्गातील मुलांसाठी Computer Practical घेतले जाते. त्यासोबतच Computer संदर्भातील आवश्यक Theoretical माहिती देखील दिली जाते.
अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून Computer या विषयाची मूलभूत माहिती दिली जाते. हा विषय केवळ Competition किंवा Completion म्हणून शिकवला जात नाही, तर मुलांना त्यामध्ये प्रत्यक्ष रस निर्माण होईल आणि त्याचा उपयोग त्यांच्या दैनंदिन जीवनात करता येईल, या दृष्टिकोनातून शिकवला जातो.
गुरुकुलमध्ये Drawing Teacher असतात, जे मुलांना चित्र काढणे, रंगकाम आणि त्यातील विविध तंत्रांबाबत मार्गदर्शन करतात.
फक्त Grade मिळवण्यासाठी किंवा परीक्षा पूर्ण करण्यासाठी Drawing आणि Colouring शिकवले जात नाही. मुलाची आवड आणि कलागुण ओळखून त्यांना त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
गुरुकुलमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. शनिवारी घेतल्या जाणाऱ्या Activities मध्ये वैदिक गणित, General Knowledge यांसारखे विषय घेतले जातात.
होय. मुलांसाठी Team-wise विविध खेळ घेतले जातात.
मुलांना Turn-wise खेळण्याची संधी दिली जाते. एखाद्या मुलाची किंवा Team ची Turn येईपर्यंत ते इतर Team चा Performance पाहतात आणि त्यांना Cheer करतात.
यामुळे मुलांमध्ये Teamwork, एकमेकांना प्रोत्साहन देण्याची भावना आणि खेळाडूवृत्ती विकसित होते.
प्रत्येक मूल वेगळे असते आणि प्रत्येकामध्ये काही ना काही विशेष गुण असतात.
गुरुकुलमध्ये मुलांना केवळ Rat Race चा भाग न बनता स्वतंत्र आणि वेगळी विचारसरणी कशी विकसित करावी, याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते.
“माझ्यातील मी शोधणे” आणि त्या गुणांवर काम करणे यावर भर दिला जातो.
त्यामुळे मुलांची स्पर्धा इतरांशी नसून स्वतःशीच असावी, हा विचार त्यांच्यामध्ये रुजवला जातो.
मुलांना इतर मुलांपेक्षा तू वेगळा आहेस आणि तुझ्यामध्ये असलेले गुण कोणते वेगळे आहेत, हे समजावून सांगितले जाते.
त्याचबरोबर भविष्यासाठी सध्या बारा तास गुरुकुलमध्ये राहणे ही एक Investment कशी आहे, हे मुलांना समजावून सांगितले जाते.
आजचा वेळ आणि मेहनत ही त्यांच्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे, हा विचार त्यांच्या मनामध्ये रुजवला जातो.
मुलांचा Basic Foundation अगदी Pre-Primary पासून मजबूत केला जातो.
त्यांना अभ्यासासाठी ठराविक वेळ दिला जातो. त्या वेळेत त्यांना Selected Syllabus शिकवला जातो. शिकवल्यानंतर त्याची परीक्षा किंवा Evaluation घेतले जाते आणि त्यानंतर पुढील Syllabus सुरू केला जातो.
साधारणपणे सहावीपर्यंत इंग्रजी, मराठी आणि गणित या विषयांचा पाया मजबूत केला जातो.
मराठीच्या माध्यमातून इंग्रजी व्याकरण समजावून सांगितल्यामुळे इतर विषय समजून घेणेही मुलांना सहज होते.
वाचन कसे करावे, लेखन कसे करावे आणि एखाद्या गोष्टीचा अर्थ समजून कसा घ्यावा, याबाबतही मुलांना सातत्याने मार्गदर्शन केले जाते आणि त्यांना पुढे नेले जाते.
गुरुकुलमध्ये Maharashtra State Board – English Medium हा अभ्यासक्रम घेतला जातो.
त्यासोबतच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध Practical Activities आणि उपक्रमांवरही भर दिला जातो.
होय. गुरुकुलमध्ये आलेल्या मुलाला संस्कारक्षम बनवणे, त्याच्यामध्ये शिस्त निर्माण करणे आणि त्याच्यातील अहंकार कमी करणे, यासाठी गुरुकुलची भूमिका महत्त्वाची असते.
गुरुकुलचे मुख्य ध्येय म्हणजे मुलांना योग्य पद्धतीने घडवणे.
या मुलांना घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये पालकांवर काही नियम आणि निर्बंध असणेही आवश्यक असते. कारण मुलांच्या संस्कार आणि विकासामध्ये पालकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असते.
पालक जेव्हा आमच्याकडे Admission साठी येतात, तेव्हा मुलांच्या Admission आधीच पालकांना गुरुकुलची नियमावली समजावून सांगितली जाते.
यामुळे पालकांना गुरुकुलची कार्यपद्धती, शिस्त आणि मुलांच्या संगोपनाबाबतच्या अपेक्षा सुरुवातीपासूनच स्पष्ट असतात.
गुरुकुलमध्ये लहान मुलांची विशेष काळजी घेण्यासाठी प्रत्येक लहान मुलाला एक Mentor Assign केलेला असतो.
हा Mentor त्या मुलाच्या दैनंदिन गरजा आणि विविध गोष्टींची काळजी घेतो.
उदाहरणार्थ, एखादा लहान मुलगा जेवायला बसला असेल तर तो व्यवस्थित जेवत आहे की नाही, त्याला जेवताना काही अडचण येत आहे का, तो जेवत नसेल तर त्याला जेवण्यासाठी मदत करणे इत्यादी गोष्टींची काळजी घेतली जाते.
या मुलाचा Mentor हा साधारणपणे मोठ्या वर्गातील विद्यार्थी असतो. तो छोट्या विद्यार्थ्याची काळजी घेतो.
यामुळे छोट्या विद्यार्थ्याला आधार मिळतो आणि मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यामध्येही जबाबदारीची जाणीव निर्माण होते.
गुरुकुलमध्ये दिवसातील खाण्याचे नियोजन तीन वेळांमध्ये केले जाते:
सकाळचा नाश्ता हलका दिला जातो. यामध्ये काढे, फळे, भाज्या अशा गोष्टींचा समावेश असतो.
दुपारचे जेवण साधारणपणे बारा वाजण्याच्या दरम्यान दिले जाते. यावेळी मुलांना पोटभर जेवण दिले जाते. यामध्ये भाजी, चपाती, भात आणि त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या दिल्या जातात.
यामध्ये पालेभाज्या, कडधान्ये, फळभाज्या अशा विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश केला जातो.
संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये भेळ, पोहे, उपमा अशा विविध पदार्थांचा समावेश असतो.
गुरुकुलमध्ये अनेक Activities अशा आहेत, ज्यांच्या माध्यमातून मुलांना Practical Knowledge दिले जाते.
उदाहरणार्थ, लहान वर्गातील एखाद्या मुलाची जबाबदारी मोठ्या वर्गातील विद्यार्थ्याला दिली जाते. यामुळे मोठ्या विद्यार्थ्यामध्ये जबाबदारीची भावना निर्माण होते.
त्याचबरोबर मुलांसाठी Banking Activity घेतली जाते, जेणेकरून त्यांना दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहार समजतील.
आचार्य गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांची निवडणूक देखील घेतली जाते. यामधून मुलांना संपूर्ण निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवातून समजते.
गुरुकुलमध्ये विविध व्यावहारिक उपक्रमही घेतले जातात, जसे:
या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना केवळ पुस्तकातील ज्ञान न देता प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडणारे Practical Knowledge दिले जाते.
हा उपक्रम आचार्य गुरुकुलमध्ये विशेष पद्धतीने राबवला जातो. गुरुकुलमध्ये दैनंदिन व्यवहाराशी संबंधित विविध उपक्रम मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकवले जातात. त्यामुळे हा उपक्रम गुरुकुलच्या संपूर्ण कार्यपद्धतीचा एक महत्त्वाचा भाग आहे.
हा उपक्रम सर्व स्तरावर नावाजलेला उपक्रम आहे.
आचार्य गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक जबाबदारी आणि बचतीचे महत्त्व शिकवण्यासाठी “आचार्य गुरुकुलम बँक” हा विशेष उपक्रम राबवला जातो.
विद्यार्थ्यांना त्यांच्या चांगल्या वर्तन, शिस्त आणि नियमबद्धतेच्या आधारावर दर आठवड्याला आचार्य गुरुकुलम चलन दिले जाते.
या चलनाचा वापर करून विद्यार्थी स्टेशनरी, जेवणाचे Coupons आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करू शकतात.
यामुळे विद्यार्थ्यांना पैशांचे योग्य व्यवस्थापन, बचत आणि आर्थिक जबाबदारी यांचे महत्त्व शिकायला मिळते.
तसेच नियमांचे पालन न केल्यास दंड आकारला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीची जबाबदारी आणि आर्थिक जाणीव विकसित होते.
गुरुकुलमधील मुलांना स्वतःचे पाकीट व्यवस्थित सांभाळायलाही शिकवले जाते.
त्याचबरोबर बँकेमध्ये होणारे विविध व्यवहार प्रत्यक्ष शिकवले जातात. यामध्ये:
अशा विविध व्यवहारांचा समावेश होतो.
यामुळे मुलांना आर्थिक व्यवहारांचे ज्ञान लहान वयातच प्रत्यक्ष अनुभवातून मिळते.
आचार्य गुरुकुलमध्ये सहल हा विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा आणि समृद्ध अनुभव असतो.
सहलीसाठी अशा ठिकाणांची निवड केली जाते, जी विद्यार्थ्यांना आनंद, साहस आणि नवीन ठिकाणाचा अनुभव देतात.
या सहलीमध्ये Trekking, विविध साहसी उपक्रम, निसर्गाचा जवळून अनुभव आणि आध्यात्मिक वातावरणाचा परिचय करून दिला जातो.
यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्यामध्ये साहसाची भावना विकसित होते.
सहल म्हणजे केवळ मजा आणि मनोरंजन नसते. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना एखाद्या आध्यात्मिक ठिकाणी किंवा गुरुकुलच्या दुसऱ्या शाखेतही नेले जाते.
ग्रामीण भागातील जीवन, तेथील वातावरण आणि तेथील साधेपणाचा आनंद विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता येतो. तसेच आनंदासाठी कोणत्या वस्तू किंवा Gadgets आवश्यक असतात आणि त्यांच्याशिवायही जीवन कसे आनंदी असू शकते, हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवले जाते.
यामुळे शहरी आणि ग्रामीण जीवनातील दरी कमी करण्यास मदत होते.
त्याचबरोबर पूर्वीच्या काळातील पारंपरिक खेळही विद्यार्थ्यांना खेळवले जातात. उदाहरणार्थ:
अशा पारंपरिक खेळांमधून विद्यार्थ्यांना जुन्या काळातील खेळ, ग्रामीण जीवन आणि निसर्गाशी असलेले नाते यांचा अनुभव मिळतो.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांमधूनच नेत्यांची निवड केली जाते आणि संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष निवडणुकीप्रमाणे पार पाडली जाते.
यामध्ये:
अशा निवडणुकीतील विविध टप्प्यांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला जातो.
यामुळे विद्यार्थ्यांना नेतृत्व, निर्णयक्षमता, जबाबदारी आणि लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व समजते. तसेच त्यांचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकास वाढण्यास मदत होते.
लहानपणापासूनच मुलांना लोकशाही म्हणजे काय, ती प्रत्यक्षात कशी जपता येते आणि निवडून आल्यानंतर आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्या काय असतात, याची प्रत्यक्ष माहिती दिली जाते.
तसेच समाजात असणारे आदर्श वर्तन त्यांना शिकवले जाते.
यातूनच भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी सक्षम आणि जबाबदार नागरिक घडवण्याचा प्रयत्न केला जातो.
होय. यामागे केवळ स्वच्छतेचा उद्देश नसून मुलांमध्ये अहंकार कमी करण्याचा संस्कार निर्माण करणे हा देखील महत्त्वाचा उद्देश आहे.
स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्याबरोबरच मुलांना नम्रता आणि साधेपणाच्या दिशेने आणणे आवश्यक आहे.
मुले आई-वडिलांसोबत राहताना अनेक गोष्टी सहज अनुभवतात. उदाहरणार्थ, “माझ्याकडे गाडी आहे”, “आमच्याकडे हे आहे”, “आमच्याकडे ते आहे” अशा गोष्टींची जाणीव त्यांना असते.
गुरुकुलमध्ये त्यांना गुरुकुलाच्या शिष्य परंपरेत आणणे गरजेचे आहे. त्यासाठी मुलांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिला जातो.
त्यांच्या हातात झाडू दिला जातो, जेणेकरून त्यांना जमिनीशी जोडलेपणाची जाणीव होईल आणि अहंकार कमी होईल.
यातून “Somebody to Nobody” असा प्रवास घडवण्याचा प्रयत्न केला जातो.
यामुळे मुलांमध्ये नम्रता, साधेपणा, श्रमाची प्रतिष्ठा आणि कोणतेही काम कमीपणाचे नसते, ही भावना निर्माण होते. पुढे काहीतरी नवीन शिकण्याची आणि स्वीकारण्याची मानसिकता तयार होण्यासही याची मदत होते.
आचार्य गुरुकुल हे एक आधुनिक गुरुकुल आहे. म्हणजेच आपल्या पारंपरिक संस्कारांचा आणि सध्याच्या आधुनिक परिस्थितीचा योग्य समन्वय साधला आहे.
गुरुकुलमध्ये State Board – English Medium चा अभ्यासक्रम घेतला जातो. त्यामुळे मुलांना आधुनिक शिक्षणपद्धतीनुसार आवश्यक शैक्षणिक ज्ञान मिळते.
त्याचबरोबर गुरुकुलमध्ये मुलांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये काही महत्त्वाचे गुण आणि मूल्ये रुजवली जातात.
मुलांमध्ये नम्रता, चिकाटी, आदर, आत्मविश्वास, प्रेम, निष्ठा आणि संयम यांसारखे गुण विकसित केले जातात.
म्हणून गुरुकुलमध्ये मुलांना केवळ पारंपरिक शिक्षण दिले जात नाही किंवा केवळ आधुनिक शिक्षणावरही भर दिला जात नाही. परंपरा आणि वर्तमानकाळाची गरज यांचा समतोल साधून मुलांना भविष्यातील जगासाठी तयार केले जाते.