आमच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल, शैक्षणिक पद्धतीबद्दल आणि शाळेच्या नियमांबद्दल पालकांच्या मनात अनेकदा काही प्रश्न असतात. पालकांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी आम्ही खाली काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
आचार्य गुरुकुलम 2.0 मध्ये पहिल्या गुरुकुलमधील शिक्षण, संस्कार, शिस्त आणि Practical Learning यासोबतच काही विशेष सुविधा जोडण्यात आल्या आहेत.
माळशिरस, सोलापूर येथील या Campus मध्ये मुलांसाठी Hostel Facility आणि Farming-Based Practical Activities या दोन विशेष गोष्टी आहेत.
यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच स्वावलंबन, जबाबदारी, निसर्गाशी नाते आणि शेतीचे प्रत्यक्ष ज्ञान मिळण्याची संधी मिळते.
गुरुकुलमध्ये मुलांना केवळ शालेय शिक्षण देणे हा उद्देश नाही, तर त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीतून त्यांना शिस्त, स्वावलंबन, जबाबदारी आणि संस्कार शिकवणे हा देखील उद्देश आहे.
Hostel Facility मुळे मुलांना गुरुकुलच्या वातावरणात अधिक सातत्याने राहून शिकता येते.
दैनंदिन जीवनातील स्वतःची कामे करणे, वेळेचे नियोजन करणे, आपल्या वस्तूंची काळजी घेणे, शिस्त पाळणे आणि इतर विद्यार्थ्यांसोबत राहणे या गोष्टी मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकता येतात.
Hostel Life मुळे मुलांना स्वावलंबन आणि जबाबदारी शिकण्याची संधी मिळते.
स्वतःच्या वस्तूंची काळजी घेणे, वेळेचे नियोजन करणे, स्वतःची कामे करणे, इतरांसोबत जुळवून घेणे, Teamwork करणे आणि शिस्त पाळणे असे अनेक गुण मुलांमध्ये विकसित होतात.
यामुळे मुलांना भविष्यातील स्वतंत्र जीवनासाठी तयार होण्यास मदत होते.
शेती ही केवळ एक व्यवसायाची गोष्ट नसून ती आपल्या जीवनाचा आणि निसर्गाचा महत्त्वाचा भाग आहे.
मुलांनी केवळ पुस्तकांमधून शेतीबद्दल माहिती न घेता प्रत्यक्ष शेतीच्या माध्यमातून शिकावे, हा यामागचा उद्देश आहे.
मुलांना माती, पाणी, पिके, निसर्ग आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीची प्रत्यक्ष जाणीव व्हावी, यासाठी Farming Activities घेतल्या जातात.
शेतीच्या माध्यमातून मुलांना अनेक जीवनमूल्ये प्रत्यक्ष अनुभवातून शिकता येतात.
यामध्ये मेहनत, संयम, शिस्त, जबाबदारी, निसर्गप्रेम आणि स्वावलंबन यांसारख्या गुणांचा विकास होतो.
एखादे बी पेरल्यानंतर लगेच त्याचे फळ मिळत नाही. त्यासाठी सातत्याने काळजी घ्यावी लागते. यातून मुलांना Patience आणि Consistency यांचे महत्त्वही समजते.
आजची मुले तंत्रज्ञान आणि Digital वातावरणाशी जोडलेली आहेत. त्यामुळे त्यांना निसर्ग आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
Farming Activity मुळे मुलांना मोबाईल, पुस्तके किंवा स्क्रीनच्या बाहेर जाऊन माती, पाणी, झाडे आणि निसर्गाशी प्रत्यक्ष जोडले जाण्याची संधी मिळते.
यामुळे Practical Learning सोबतच त्यांच्यामध्ये निसर्गाबद्दल संवेदनशीलता निर्माण होते.
गुरुकुलमधील विद्यार्थ्यांमध्ये नम्रता, चिकाटी, आदर, आत्मविश्वास, प्रेम, निष्ठा आणि संयम यांसारखे गुण रुजवले जातात.
गुरुकुलमधील मुलगा किंवा मुलगी स्वतःचे मत परखडपणे आणि आत्मविश्वासाने मांडू शकेल. वडीलधाऱ्यांप्रती असलेला आदर आणि प्रेम त्यांच्या वर्तनातून सहज जाणवेल.
आमच्याकडे अडीच वर्षांपासून सध्या मुले आहेत आणि ती खूप आनंदाने गुरुकुलमध्ये राहतात.
मुलांना त्यांचे बालपण गुरुकुलमध्ये मनापासून जगता यावे, याची काळजी घेतली जाते.
मुख्य म्हणजे मुलांच्या दैनंदिन शेड्यूलमध्ये तीन वेळा व्यायाम आणि Meditation असते. त्यामुळे मुलांना साधारण पंधरा मिनिटांची एकाग्र आणि जागृत विश्रांती मिळते.
मुलांना अभ्यासासोबतच मजा, मस्ती, खेळ आणि विविध उपक्रमांची संधी दिली जाते.
शनिवारी मुलांसाठी Fun Day आयोजित केला जातो. यामध्ये त्यांना प्रेरणादायी चित्रफिती आणि भाषणे दाखवली जातात. त्यानंतर त्यावर चर्चा केली जाते आणि मुलांना त्यातून काय समजले, हे जाणून घेतले जाते.
शनिवारी मुलांसाठी नवीन आणि व्यावहारिक Activity देखील घेतल्या जातात. उदाहरणार्थ, Business Introduction, Pen तयार करणे, Pencil तयार करणे अशा विविध उपक्रमांचा त्यामध्ये समावेश असतो.त्यामुळे त्यांना अजिबात कंटाळा येत नाही.
विशेष म्हणजे संध्याकाळी साडेसातनंतरसुद्धा मुलांना गुरुकुलमध्ये थांबावेसे वाटते.
मुलांना सुरुवातीपासूनच वाचन आणि लेखनाचा सराव करून घेतला जातो. वर्गातील Small Instructions हळूहळू इंग्रजीमध्येच दिल्या जातात.
जसा मुलांचा वर्ग पुढे जातो, तसतसे इंग्रजी व्याकरणही शिकवले जाते.
सहावीपासून Spoken English आणि Teaching साठी Practical Subject म्हणून इंग्रजीचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे मुलांना इंग्रजी समजण्यासोबतच ते आत्मविश्वासाने बोलण्याचा सरावही होतो.
मुलांना प्रथम एक भाषा व्यवस्थित आणि मजबूत करून घेतली जाते. त्यानंतर नवीन भाषा शिकताना मराठी आणि इंग्रजीच्या वाक्यरचनेमधील मूलभूत फरक मुलांना समजावून सांगितले जातात.
मुलांना सोपी इंग्रजी वाक्ये बोलण्याचा नियमित सराव करून घेतला जातो. त्यामुळे त्यांच्यामध्ये हळूहळू इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो.
साधारणपणे सहा ते सात महिन्यांच्या कालावधीत मुलाला इंग्रजी भाषेची चांगली ओळख आणि वापर करता येऊ लागतो.
आपल्या गुरुकुलमध्ये प्रत्येक विषय केवळ वरवर न शिकवता त्याचा सखोल अभ्यास करून घेतला जातो.
पाचवी आणि त्यापुढील वर्गातील मुलांसाठी Computer Practical घेतले जाते. त्यासोबतच Computer संदर्भातील आवश्यक Theoretical माहिती देखील दिली जाते.
अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून Computer या विषयाची मूलभूत माहिती दिली जाते. हा विषय केवळ Competition किंवा Completion म्हणून शिकवला जात नाही, तर मुलांना त्यामध्ये प्रत्यक्ष रस निर्माण होईल आणि त्याचा उपयोग त्यांच्या दैनंदिन जीवनात करता येईल, या दृष्टिकोनातून शिकवला जातो.
गुरुकुलमध्ये Drawing Teacher असतात, जे मुलांना चित्र काढणे, रंगकाम आणि त्यातील विविध तंत्रांबाबत मार्गदर्शन करतात.
फक्त Grade मिळवण्यासाठी किंवा परीक्षा पूर्ण करण्यासाठी Drawing आणि Colouring शिकवले जात नाही. मुलाची आवड आणि कलागुण ओळखून त्यांना त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
गुरुकुलमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. शनिवारी घेतल्या जाणाऱ्या Activities मध्ये वैदिक गणित, General Knowledge यांसारखे विषय घेतले जातात.
होय. मुलांसाठी Team-wise विविध खेळ घेतले जातात.
मुलांना Turn-wise खेळण्याची संधी दिली जाते. एखाद्या मुलाची किंवा Team ची Turn येईपर्यंत ते इतर Team चा Performance पाहतात आणि त्यांना Cheer करतात.
यामुळे मुलांमध्ये Teamwork, एकमेकांना प्रोत्साहन देण्याची भावना आणि खेळाडूवृत्ती विकसित होते.
प्रत्येक मूल वेगळे असते आणि प्रत्येकामध्ये काही ना काही विशेष गुण असतात.
गुरुकुलमध्ये मुलांना केवळ Rat Race चा भाग न बनता स्वतंत्र आणि वेगळी विचारसरणी कशी विकसित करावी, याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते.
“माझ्यातील मी शोधणे” आणि त्या गुणांवर काम करणे यावर भर दिला जातो.
त्यामुळे मुलांची स्पर्धा इतरांशी नसून स्वतःशीच असावी, हा विचार त्यांच्यामध्ये रुजवला जातो.
मुलांना इतर मुलांपेक्षा तू वेगळा आहेस आणि तुझ्यामध्ये असलेले गुण कोणते वेगळे आहेत, हे समजावून सांगितले जाते.
त्याचबरोबर भविष्यासाठी सध्या बारा तास गुरुकुलमध्ये राहणे ही एक Investment कशी आहे, हे मुलांना समजावून सांगितले जाते.
आजचा वेळ आणि मेहनत ही त्यांच्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे, हा विचार त्यांच्या मनामध्ये रुजवला जातो.
मुलांचा Basic Foundation अगदी Pre-Primary पासून मजबूत केला जातो.
त्यांना अभ्यासासाठी ठराविक वेळ दिला जातो. त्या वेळेत त्यांना Selected Syllabus शिकवला जातो. शिकवल्यानंतर त्याची परीक्षा किंवा Evaluation घेतले जाते आणि त्यानंतर पुढील Syllabus सुरू केला जातो.
साधारणपणे सहावीपर्यंत इंग्रजी, मराठी आणि गणित या विषयांचा पाया मजबूत केला जातो.
मराठीच्या माध्यमातून इंग्रजी व्याकरण समजावून सांगितल्यामुळे इतर विषय समजून घेणेही मुलांना सहज होते.
वाचन कसे करावे, लेखन कसे करावे आणि एखाद्या गोष्टीचा अर्थ समजून कसा घ्यावा, याबाबतही मुलांना सातत्याने मार्गदर्शन केले जाते आणि त्यांना पुढे नेले जाते.
गुरुकुलमध्ये Maharashtra State Board – English Medium हा अभ्यासक्रम घेतला जातो.
त्यासोबतच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध Practical Activities आणि उपक्रमांवरही भर दिला जातो.
होय. गुरुकुलमध्ये आलेल्या मुलाला संस्कारक्षम बनवणे, त्याच्यामध्ये शिस्त निर्माण करणे आणि त्याच्यातील अहंकार कमी करणे, यासाठी गुरुकुलची भूमिका महत्त्वाची असते.
गुरुकुलचे मुख्य ध्येय म्हणजे मुलांना योग्य पद्धतीने घडवणे.
या मुलांना घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये पालकांवर काही नियम आणि निर्बंध असणेही आवश्यक असते. कारण मुलांच्या संस्कार आणि विकासामध्ये पालकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असते.
पालक जेव्हा आमच्याकडे Admission साठी येतात, तेव्हा मुलांच्या Admission आधीच पालकांना गुरुकुलची नियमावली समजावून सांगितली जाते.
यामुळे पालकांना गुरुकुलची कार्यपद्धती, शिस्त आणि मुलांच्या संगोपनाबाबतच्या अपेक्षा सुरुवातीपासूनच स्पष्ट असतात.
गुरुकुलमध्ये लहान मुलांची विशेष काळजी घेण्यासाठी प्रत्येक लहान मुलाला एक Mentor Assign केलेला असतो.
हा Mentor त्या मुलाच्या दैनंदिन गरजा आणि विविध गोष्टींची काळजी घेतो.
उदाहरणार्थ, एखादा लहान मुलगा जेवायला बसला असेल तर तो व्यवस्थित जेवत आहे की नाही, त्याला जेवताना काही अडचण येत आहे का, तो जेवत नसेल तर त्याला जेवण्यासाठी मदत करणे इत्यादी गोष्टींची काळजी घेतली जाते.
या मुलाचा Mentor हा साधारणपणे मोठ्या वर्गातील विद्यार्थी असतो. तो छोट्या विद्यार्थ्याची काळजी घेतो.
यामुळे छोट्या विद्यार्थ्याला आधार मिळतो आणि मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यामध्येही जबाबदारीची जाणीव निर्माण होते.
गुरुकुलमध्ये अनेक Activities अशा आहेत, ज्यांच्या माध्यमातून मुलांना Practical Knowledge दिले जाते.
उदाहरणार्थ, लहान वर्गातील एखाद्या मुलाची जबाबदारी मोठ्या वर्गातील विद्यार्थ्याला दिली जाते. यामुळे मोठ्या विद्यार्थ्यामध्ये जबाबदारीची भावना निर्माण होते.
त्याचबरोबर मुलांसाठी Banking Activity घेतली जाते, जेणेकरून त्यांना दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहार समजतील.
आचार्य गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांची निवडणूक देखील घेतली जाते. यामधून मुलांना संपूर्ण निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवातून समजते.
तसेच, Farming Activity हा देखील Practical Learning चा महत्त्वाचा भाग आहे. मुलांना शेतीच्या माध्यमातून माती, बियाणे, पिकांची लागवड, झाडांची काळजी आणि शेतीतील विविध कामांचा प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. यामुळे मुलांना निसर्गाशी जोडले जाणे, मेहनतीचे महत्त्व, संयम, जबाबदारी आणि अन्न तयार होण्यामागील प्रक्रिया समजते.
गुरुकुलमध्ये विविध व्यावहारिक उपक्रमही घेतले जातात, जसे:
हा उपक्रम आचार्य गुरुकुलमध्ये विशेष पद्धतीने राबवला जातो. गुरुकुलमध्ये दैनंदिन व्यवहाराशी संबंधित विविध उपक्रम मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकवले जातात. त्यामुळे हा उपक्रम गुरुकुलच्या संपूर्ण कार्यपद्धतीचा एक महत्त्वाचा भाग आहे.
हा उपक्रम सर्व स्तरावर नावाजलेला उपक्रम आहे.
आचार्य गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक जबाबदारी आणि बचतीचे महत्त्व शिकवण्यासाठी “आचार्य गुरुकुलम बँक” हा विशेष उपक्रम राबवला जातो.
विद्यार्थ्यांना त्यांच्या चांगल्या वर्तन, शिस्त आणि नियमबद्धतेच्या आधारावर दर आठवड्याला आचार्य गुरुकुलम चलन दिले जाते.
या चलनाचा वापर करून विद्यार्थी स्टेशनरी, जेवणाचे Coupons आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करू शकतात.
यामुळे विद्यार्थ्यांना पैशांचे योग्य व्यवस्थापन, बचत आणि आर्थिक जबाबदारी यांचे महत्त्व शिकायला मिळते.
तसेच नियमांचे पालन न केल्यास दंड आकारला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीची जबाबदारी आणि आर्थिक जाणीव विकसित होते.
गुरुकुलमधील मुलांना स्वतःचे पाकीट व्यवस्थित सांभाळायलाही शिकवले जाते.
त्याचबरोबर बँकेमध्ये होणारे विविध व्यवहार प्रत्यक्ष शिकवले जातात. यामध्ये:
अशा विविध व्यवहारांचा समावेश होतो.
यामुळे मुलांना आर्थिक व्यवहारांचे ज्ञान लहान वयातच प्रत्यक्ष अनुभवातून मिळते.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांमधूनच नेत्यांची निवड केली जाते आणि संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष निवडणुकीप्रमाणे पार पाडली जाते.
यामध्ये:
अशा निवडणुकीतील विविध टप्प्यांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला जातो.
यामुळे विद्यार्थ्यांना नेतृत्व, निर्णयक्षमता, जबाबदारी आणि लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व समजते. तसेच त्यांचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकास वाढण्यास मदत होते.
लहानपणापासूनच मुलांना लोकशाही म्हणजे काय, ती प्रत्यक्षात कशी जपता येते आणि निवडून आल्यानंतर आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्या काय असतात, याची प्रत्यक्ष माहिती दिली जाते.
तसेच समाजात असणारे आदर्श वर्तन त्यांना शिकवले जाते.
यातूनच भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी सक्षम आणि जबाबदार नागरिक घडवण्याचा प्रयत्न केला जातो.
आचार्य गुरुकुल हे एक आधुनिक गुरुकुल आहे. म्हणजेच आपल्या पारंपरिक संस्कारांचा आणि सध्याच्या आधुनिक परिस्थितीचा योग्य समन्वय साधला आहे.
गुरुकुलमध्ये State Board – English Medium चा अभ्यासक्रम घेतला जातो. त्यामुळे मुलांना आधुनिक शिक्षणपद्धतीनुसार आवश्यक शैक्षणिक ज्ञान मिळते.
त्याचबरोबर गुरुकुलमध्ये मुलांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये काही महत्त्वाचे गुण आणि मूल्ये रुजवली जातात.
मुलांमध्ये नम्रता, चिकाटी, आदर, आत्मविश्वास, प्रेम, निष्ठा आणि संयम यांसारखे गुण विकसित केले जातात.
म्हणून गुरुकुलमध्ये मुलांना केवळ पारंपरिक शिक्षण दिले जात नाही किंवा केवळ आधुनिक शिक्षणावरही भर दिला जात नाही. परंपरा आणि वर्तमानकाळाची गरज यांचा समतोल साधून मुलांना भविष्यातील जगासाठी तयार केले जाते.